ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथील देवस्थान ट्रस्ट बरखास्त करावे,अन्यथा ता. १५ पासून आंदोलन आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांचा इशारा.

आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून कारवाई करावी. अन्यथा ता.१५ पासून धर्मादाय कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिला आहे.
 खरसुंडी येथील श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट ने सन 2012 13 ते 2015 16 या कालावधीत जाणीवपूर्वक लेखापरीक्षण केले नसून मंदिरातील सहा खांबावर भाविकांनी अर्पण केलेली सुमारे 100 किलो चांदी परस्पर गायब केली आहे. भाविकाच्या तक्रारीनंतर ही चांदी बसवली नाही. या चांदी प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोशींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सर्व बाबींमध्ये दोशी असणाऱ्यावर कारवाई साठी दिनांक १५ मे पासून धर्मादाय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे खरात यांनी सांगितले आहे.
पत्रकार परीषदे दरम्यान आर.पी.आय.अध्यक्ष राजेंद्र खरात.
Previous Post Next Post