ब्रेकिंग न्यूज

वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेला आर्थिक मदत. रयत चे सल्लागार विलास नाना शिंदे यांचा उपक्रम.

 खरसुंडी प्रतिनिधी 

हल्लीच्या युगात वाढदिवसानिमित्त होणारा वायफळ खर्च टाळून आपल्या शाळेला देणगी देण्याचा स्तुत्य उपक्रम रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग सल्लागार विलास नाना शिंदे यांनी राबवला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी श्री विलास नाना शिंदे यांची नात कु. परी हीच्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून त्यांनी खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ विद्यालयास रुपये पंचवीस हजारांची मदत केली आहे. विद्यार्थ्यां समवेत साधेपणाने वाढदिवस साजरा करून उपस्थित मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी कु. परीला शुभेच्छा देण्यासाठी लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगवले, मुख्याध्यापक श्री पवार सर ,माजी सरपंच अंजली गुरव, माजी उपसरपंच दिलीप सवणे, सदस्य विक्रम भिसे शिक्षक व ग्रामस्थ तसेच शिंदे कुटुंबीय उपस्थित होते. 

शाळेस आर्थिक मदत सुपूर्त करताना विलास नाना शिंदे सोबत सरपंच धोंडीराम इंगवले मुख्याध्यापक श्री पवार सर.

आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे देणे लागतो, या भावनेने हा उपक्रम राबवला असून रयतच्या शाळांना अशाप्रकारे ठीक ठिकाणी मदत करणार आहे .

श्री विलास नाना शिंदे सल्लागार

रयत शिक्षण संस्था

Previous Post Next Post