ब्रेकिंग न्यूज

खरसुंडीत मुख्य पेठेतील अतिक्रमणांवर ग्रामपंचायत कडून कारवाई, व्यापारी व प्रशासनात चकमक

खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरासमोरील मुख्य पेठेतील अतिक्रमणाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष श्री शेखर निचळ यांनी वेळोवेळी आंदोलन केले होते .त्या पार्श्वभूमीवर आज ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली. यावेळी चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याने व्यापारी व प्रशासन यांच्यात वेळोवेळी शाब्दिक चकमक झाली.यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनाने व्यापाऱ्यांचे साहित्य जप्त करून अन्यत्र हलवले त्याचबरोबर सावलीसाठी लावलेले पडदे काढून टाकले.व्यापाऱ्यांनी अतिक्रमण काढून घेण्याची भूमिका घेऊन ही जेसीबीच्या साह्याने कारवाई केली यामुळे व्यापाऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले.यावेळी आटपाडी पोलिस ठाण्या कडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
          त्यानंतर नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली कारवाई चुकीची व आकसापोटी असल्याने गावातील अन्य अतिक्रमणांना अभय देऊन पाठीशी घालण्याचा उद्योग केला असल्याचा आरोप केला आहे. त्याबरोबरच  सिद्धनाथ मंदिर व जोगेश्वरी मंदिर परिसरासह गावातील सर्व अतिक्रमणे न हटवल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

खरसुंडी ता.आटपाडी येथील सिध्दनाथ मंदिरा समोरील अतिक्रमण हटवताना ग्रामपंचायत प्रशासन

मुख्य पेठेतील अतिक्रमणाबाबत तक्रारी आल्याने फक्त त्यांनाच नोटीस देऊन कारवाई केली आहे 
        पवन राऊत 
ग्रामसेवक खरसुंडी
Previous Post Next Post