आटपाडी प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी तिसऱ्या वेळी भाजपाकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर प्रथम खरसुंडी येथे श्री सिद्धनाथचे दर्शन घेऊन साकडे घातले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली मतदारसंघात खासदार संजय काका पाटील यांच्या बाबत पक्षांतर्गत विरोधामुळे तिकीट कापले जाणार असल्याबाबतच्या चर्चेला ऊत आला होता. मात्र या सर्वांवर मात करून तिसऱ्या वेळी भाजपाचे तिकीट मिळवण्यात खासदार संजय काका पाटील यशस्वी झाले .दुसऱ्या यादी तिकीट जाहीर झाल्यानंतर खा.संजय काकांनी खरसुंडीत कुलस्वामी श्री सिद्धनाथाच्या दरबारात हजेरी लावली. यावेळी समर्थकांनी त्यांचे फटाक्यांच्या आताषबाजीत भव्य स्वागत केले. त्यानंतर श्री सिद्धनाथ मंदिरात अभिषेक करून दर्शन घेतले. यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी काकांचा सत्कार करून निवडणुकीबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष विनायक शेठ मासाळ, भाजपा जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील ,प्रमोद आप्पा शेंडगे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव गुरव खरसुंडीचे सरपंच धोंडीराम इंगवले ,महादेव पाटील ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय, विवेक पुजारी वैभव पुजारी, प्रमोद भोसले , राहुल गुरव सोसायटीचे चेअरमन जगदीश पुजारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशमुख गट अनुपस्थित
खासदार संजय काका पाटील यांच्या आजच्या दौऱ्यात नेहमी हजर असणारा तालुक्यातील देशमुख गट आज अनुपस्थित होता.
खरसुंडी ता.आटपाडी येथील सिध्दनाथ मंदिरात खा.संजय काका पाटील यांना शुभेच्छा देताना माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर . |