आटपाडी प्रतिनिधी
वलवण ता. आटपाडी येथे काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने घराची भिंत कोसळून सात शेळ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत .घटनास्थळी आ. सुहास बाबर यांच्यासह तालुका प्रशासनाने भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी वलवणच्या पश्चिमेस स्वाती निलेश जाधव यांचे शेत असून त्यांच्याकडे सुमारे पंधराहून अधिक शेळ्या आहेत. आज सकाळी शेळ्यांना चारा घालून त्या गावाकडे गेल्या त्यानंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे भिंत कोसळून चार मोठ्या शेळ्या व तीन बोकडे जागीच मृत्युमुखी पडले आहेत. सुमारे सव्वा लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. दुपारी ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच आ. सुहास बाबर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पशुधनाच्या नुकसानीबाबत आश्वासित केले .
यावेळी तहसीलदार बंडगर मॅडम ,पोलीस उपनिरीक्षक थोरात ,उपसरपंच आबासाहेब जाधव ,पंढरीनाथ थोरात, बाळासो गुरव, ग्रामसेवक सोमनाथ शिंत्रे तलाठी अमीर मुल्ला ,पोलीस पाटील सुहास शिंदे उपस्थित होते. दरम्यान वलवण येथील शिंदे मळ्याकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक टप्पे झाली आहे .पाऊसामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे शक्य नसल्याने प्रशासनाने सुट्टी जाहीर करण्याची मागणी होत आहे.
वलवण ता.आटपाडी येथे पाहणी करताना आ.सुहास बाबर व्तालुका प्रशासन