आटपाडी प्रतिनिधी
झरे ता.आटपाडी येथे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ.श्री.चन्नसिध्दराम पंडितराध्य भगवत्पाद श्रीशैल महापीठ यांचा अड्डपालखी सोहळा व कुंभ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.दुपारी ४ वाजता महादेव मंदिर ते आ.गोपीचंद पडळकर यांच्या अतिथीगृहा पर्यंत हा सोहळा होणार आहे.त्यानंतर धर्मसभा आशीर्वाचान व महाप्रसाद होणार आहे.
या कार्यक्रमाची मोठी तयारी करण्यात आली आहे.कार्यक्रमास तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे संयोजन वीरशैव लिंगायत समाज व आ.पडळकर प्रेमींच्या वतीने करण्यात आले आहे.