आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथे वंदेमातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भवानी विद्यालयाच्या प्रांगणात सामूहिक गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार शितल बंडगर यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले .यावेळी गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, गटशिक्षणाधिकारी मयूर लांडे, प्राध्यापक शिवाजीराव भोसले, सुहास जगताप नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे, प्राध्यापक विजय शिंदे उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत शामसुंदर ठोंबरे यांनी केले यावेळी प्राध्यापक विजय शिंदे यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास व गौरवशाली परंपरा याबाबत माहिती दिली . तहसीलदार शितल बंडगर यांनी राष्ट्रप्रेम, शिस्त व देशभक्ती याबाबतचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक प्रथमेश शिंदे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीकृष्ण पडळकर यांनी केले कार्यक्रमास आटपाडी एज्युकेशन सह विविध शाळा महाविद्यालय आयटीआय चे विद्यार्थी शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आटपाडी येथे वंदेमातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भवानी विद्यालयाच्या प्रांगणात सामूहिक गायनाचा कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी तहसीलदार शितल बंडगर व मान्यवर .
