ब्रेकिंग न्यूज

जिल्हा बँकेच्या झरे ता. आटपाडी येथील शाखेत जबरी दरोडा, बँकेच्या स्ट्रॉंग रूम मधील लॉकर फोडून कोठ्याावधीचा ऐवज लंपास.

आटपाडी  प्रतिनिधी 
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे झरे ता. आटपाडी येथील शाखेत काल मध्यरात्री चोरट्यानी खिडकीतून प्रवेश करून बँकेचा स्ट्रॉंग रूम मधील 22 लॉकर फोडून कोट्यावधीचा ऐवज लंपास केला आहे.जिल्हा बँकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी झरे ता.आटपाडी येथे स्टँड परिसरामध्ये तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये भाड्याने बँकेची शाखा कार्यरत आहे.काल मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी पूर्वेच्या दिशेला असणाऱ्या खिडकीचे गज कापून बँकेमध्ये प्रवेश केला व गॅस कटरच्या साह्याने स्ट्राँग रूम मधील 22 लॉकर तोडले. त्यामध्ये ग्राहकांनी ठेवलेले सोने-चांदी व रोख रक्कम लंपास केली. ही बाब सकाळी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना सांगितले व त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
 या घटनेची माहिती मिळतात बँकेच्या ग्राहकांनी शाखेत एकच गर्दी केली त्यानंतर पोलिसांनी तुटलेल्या लॉकरच्या मालकांना बोलवून चोरीस गेलेल्या दागिन्याचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केली. यावेळी चोर ट्यांनी चोरी करताना पकडले जाऊ नये याची पूर्ण दक्षता घेतली असल्याचे दिसून आले.चोरी करताना हातमोजे वापरल्याची बाब पुढे आली असून शाखेत प्रवेश करताच चोरट्यानी सीसीटीव्ही बंद करून डीव्हीआर ताब्यात घेतला आहे.
 या घटनेची माहिती मिळतात आटपाडी पोलिसांनी तातडीने हालचाली करून ठसे तज्ञ,स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांना बोलवून तपास काम सुरू केले आहे.
 एक वर्षांपूर्वी या ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता.दरम्यान घटनास्थळास आमदार गोपीचंद पडळकर, बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, पोलीस उपअधीक्षक कल्पना बारवकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
 पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत तपास काम व गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. लॉकर मधील चोरी मुळे झालेले नुकसान व बँकेचे भरपाई बाबतचे धोरण माहित नसल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 चोरीची व्याप्ती पाहता सुमारे सात किलो सोने व 20 किलो चांदी तसेच रोख रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
 जिल्हा बँकेच्या झरे तालुका आटपाडी येथील शाखेतील लॉकर तोडून चोरट्यांनी कठ्यावधीचा ऐवज लंपास केला आहे 
Previous Post Next Post