आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्याचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन दादासाहेब निवृत्ती पवार उर्फ मामा रा.घरनिकी ता. आटपाडी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९९ वर्षी निधन झाले.त्यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या बुधवार ता.७ रोजी साडेअकरा वाजता घरनिंकी येथे होणार आहेत.
आटपाडी तालुक्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते व सहकार चळवळीत महत्वाची भूमिका बजावलेले दादासाहेब पवार हे दा. नि.मामा नावाने सर्वत्र परिचित होते. त्यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन, तालुका देखरेख संघ, जिल्हा देखरेख संघ, अडवाईस कमिटी, बाजार समिती, तालुका सचिव सांस्कृतिक भवन, विकास सोसायटी, दूध संस्था अशा विविध सहकारी संस्थांवर काम पाहिले होते.
राजकारणामध्ये कटूता निर्माण न होता गावामध्ये विकास कामे व एकोपा ठेवण्याचे सूत्र त्यांनी नेहमी अवलंबले होते त्यामुळे त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांचे सुलोख्याचे संबंध होते. जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या वास्तूचे त्यांच्याच कार्यकालात उद्घाटन झाले होते. त्यांच्या पश्चात मुले, मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे. दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे संचालक महिपतराव पवार यांचे ते वडील होते.त्यांच्या निधना मुळे तालुक्यातील एक ज्येष्ठ नेता व सहकार चळवळीचा मार्गदर्शक हरपला आहे.अंत्यसंस्कार ता. ७ रोजी साडेअकरा वाजता घरनिंकी येथे होणार आहेत.