आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात श्रीनाथ जन्माष्टमीनिमित्त गुरुवार ता. सहा पासून भैरवनाथ महात्म्य ग्रंथ पारायण व अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला आहे. सप्ताह निमित्त दररोज काकड आरती, ग्रंथ वाचन भजन, कीर्तन ,हरिपाठ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .सप्ताहातील मुख्य दिवस बुधवार ता. 12 रोजी रात्री बारा वाजता चंद्रोदयानंतर श्रींचा जन्मोत्सव संपन्न होणार आहे. गुरुवार ता. 13 रोजी ग्रंथ समाप्ती, दिंडी सोहळा व भारुड तसेच कुस्ती मैदान असे कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट, भाविक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .दरम्यान जन्मोत्सवा निमित्त सोनारी ते खरसुंडी पायी दिंडी व उज्जैन ते खरसुंडी भक्तीज्योत या धार्मिक उपक्रमांचा प्रारंभ झाला आहे.
श्री सिद्धनाथ श्री क्षेत्र खरसुंडी
