ब्रेकिंग न्यूज

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर ता. 5 फेब्रुवारी रोजी होणार मतदान. चिंचणी यात्रेमुळे मोठा पेच.

आटपाडी प्रतिनिधी
राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचा समावेश असून. ता.5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र ता. ५ रोजी मायाक्का चिंचणी यात्रा असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
 राज्य निवडणूक आयोगाच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत खालील प्रमाणे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
 
वरील प्रमाणे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून ता. ५ फेब्रुवारी मतदाना दिवशी मायाक्का चिंचणी यात्रेत बोणी नैवध्य असल्याने कार्यकर्ते, नेते व इच्छुकात मोठा पेच निर्माण झाला आहे. चिंचणी ता. रायबाग येथील मायाक्का देवी हे धनगर समाजाबरोबरच बहुसंख्य लोकांची कुलदेवता आहे. यामुळे तालुक्यातील सुमारे ऐंशी टक्के लोक या यात्रेला जातात.त्याचबरोबर बैलगाडी घेऊन जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हक्काचा मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे नेते व इच्छुक उमेदवार,मतदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

 या निवडणुकीसाठी राज्यातील 2.09 कोटी मतदार हक्क बजावणारा असून त्यामध्ये 1.07 कोटी पुरुष 1.02 कोटी स्त्रिया आणि ४७३ इतर मतदारांचा समावेश आहे.यासाठी मतदान केंद्रावर एकूण २५४८२ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

मतदारांना आपले नाव, क्रमांक व केंद्र पाहण्यासाठी मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन ही माहिती घेता येणार आहे. मतदान केंद्रावर जेष्ठ नागरिक, लहान मुले व गरोदर स्त्रियांना मतदानाकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या मतदारसंघांमध्ये स्त्री मतदार अधिक आहेत त्या ठिकाणी पिंक मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रात मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून फक्त स्त्रियांची नेमणूक करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रावर सावली,स्वच्छतागृह, व दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत या निवडणुकीसाठी आयोगाकडून २७ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

 प्रदीर्घ कालावधीनंतर प्रतीक्षेत असणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुक अखेर जाहीर झाली आहे.मात्र चिंचणी यात्रेमुळे तालुक्यात मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे यातून मतदार, इच्छुक उमेदवार व नेते काय मार्ग काढतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
Previous Post Next Post