आटपाडी प्रतिनिधी
निंबवडे विकास सोसायटीने सण २०२४/२५ या आर्थिक वर्षात सभासदांना आठ टक्के लाभांश वाटप करून आपली परंपरा कायम ठेवली आहे .निंबवडे विकास सोसायटी ही तालुक्यातील अग्रगण्य संस्थेपैकी एक संस्था आहे .या संस्थेची वार्षिक सभा नुकतीच संपन्न झाली यावेळी सभासदांना आठ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला .यावेळी संस्थेचे चेअरमन दशरथ देवडकर, उपाध्यक्ष विठोबा वाक्षे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. यावेळी सचिव बाळू देटे यांनी संस्थेची संपत्ती स्थितीबाबत अहवाल सादर केला. सभेत सभासदांनी विविध विषयावर चर्चा केली. संस्थेने आठ टक्के लाभांश दिल्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले आभार डॉ.बी. टी. पिंजारी यांनी व्यक्त केले