ब्रेकिंग न्यूज

वलवण येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा.

आटपाडी प्रतिनिधी 
विकास कामांच्या मुद्द्यावरून वलवण ता.आटपाडी येथील कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिला. 
वलवत सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी पाटील, माजी उपसरपंच मारुती जाधव, ग्रामपंचायत सदस्य तातोबा जाधव ,संजय जाधव ,नंदकुमार शेठ, बापूराव ड्रायव्हर आदी कार्यकर्त्यांनी यावेळी सुहास बाबर यांना पाठिंबा दर्शवत मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला .
यावेळी उपसरपंच आबासाहेब जाधव, चेअरमन शहाजी शिंदे, आप्पासो जाधव, संचालक आनंदराव जाधव, प्रतापराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवसेना उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा व्यक्त करताना वलवण येथील कार्यकर्ते व मान्यवर.


Previous Post Next Post