आटपाडी प्रतिनिधी
शिवसेना उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आटपाडी येथे उद्या ता. 15 रोजी जाहीर सभा होणार आहे .या निमित्ताने शिवसेना मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
उद्या दुपारी दोन वाजता बचत धाम मैदानावर होणाऱ्या सभेत तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दिवंगत आ. अनिल भाऊ बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यांमध्ये विविध विकास कामे पूर्णत्वास केली आहेत.
टेंभू योजनेपासून वंचित गावांसाठी सहावा टप्पा, नागरी सुविधांसह ,गदिमा नाट्यगृह, उपजिल्हा रुग्णालय व पोलीस स्टेशन इमारत अशी अनेक कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. त्याचबरोबर आटपाडी नगरपंचायतीच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सहकार्य केले आहे या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने आटपाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.