ब्रेकिंग न्यूज

लोकनेते मोहनराव काकांना पुण्यस्मरणा निमित्त नेलकरंजीत आदरांजली.

आटपाडी प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहनराव काका भोसले यांना अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली.
आटपाडी तालुक्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर कार्यरत असणारे व काँग्रेस पक्षाची पताका अखेरपर्यंत खांद्यावर घेणाऱ्या मोहनराव काकांनी जनमानसात आपले स्थान निर्माण केले होते. त्यामुळे एक दशका नंतरही त्यांच्या स्मृती लोकांच्या मनात कायम आहेत .त्यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध स्तरातील मान्यवरांनी त्यांना नेलकरंजी येथे आदरांजली वाहिली .
सकाळी मातोश्री अंबुताई मोहनराव भोसले माध्यमिक विद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी सदस्य ,विद्यालयाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .त्यानंतर मोहनराव भोसले विकास सोसायटीमध्ये चेअरमन जालिंदर भोसले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. भोसले मळा येथील त्यांच्या समाधी स्थळावर अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम करण्यात आला. यावेळी त्यांचे सुपुत्र जयदीप व शरद भोसले यांनी समाधी पूजन केले. त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली.जिल्हा यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डी एम पाटील सर, बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष मा.बाबासाहेब भोसले, बाजार समितीचे माजी उपसभापती गणपतराव काटकर, माजी संचालक विजयकुमार पुजारी, वलवण विकास सोसायटीचे अध्यक्ष शहाजी शिंदे, माजी सरपंच सदाशिव ढगे, नेलकरंजी विकास सोसायटीचे अध्यक्ष जालिंदर भोसले, आवटेवाडीचे सरपंच किरण पवार, मा.विठ्ठल ढोबळे, मा. मोहन खरात, माजी सरपंच मोहनराव भोसले सर, माजी चेअरमन धोंडीराम भोसले, धावडवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष उमर शेख, आवटेवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष बाळासो खाडे,. वाय. डी. सरक सर, सचिन गुरव, मा.विकी बेरगळ, कानकात्रेवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत तनपुरे, सुरेंद्र कदम, रावसाहेब मेटकरी, दादाशेठ अर्जुन,.शशिकांत पाटील,जालिंदर कटरे, .दत्तात्रय यमगर, दिलीप तनपुरे, माजी सरपंच अर्जुन कोळेकर,.माणिकराव सूर्यवंशी, पोपटअण्णा भोसले, यांच्यासह मातोश्री आंबूताई मोहनराव भोसले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक मान्यवर उपस्थित होते.

स्व.मोहन काका भोसले यांना अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त नेलकरंजी येथे आदरांजली वाहताना मान्यवर

Previous Post Next Post