खरसुंडी प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती निमित्त खरसुंडी ता, आटपाडी येथील ग्रामपंचायत मध्ये अभिवादन करण्यात आले.सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तदनंतर हरितक्रांती महिला बचत गटाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले बद्दल सौ दिपाली तानाजी पुजारी यांचा व आदर्श माता सौ चिंगुताई बाबर यांचा सत्कार करण्यात आला . तसेच आदर्श विधा मंदीर शाळेचे दहावी मधील यशस्वी विध्यार्थी प्रेरणा तनपुरे ,साक्षी गायकवाड ,बिरुदेव कोळेकर यांचा पुष्पगुच्छ व रोख रक्कम देवून सत्कार करण्यात आला .
यावेळी सरपंच धोंडीराम इंगवले ,उपसरपंच राजाक्का कटरे , ग्रामसेवक कामेश्वर ऐवळे ,ग्रामपंचायत सदस्य , रयतचे सल्लागार विलास शिंदे , विटा अर्बन चे व्हा .चेअरमन बादशाह इनामदार , माजी उपसरपंच दिलीप सवणे , एकनाथ भोसले , संभाजी इंगवले , विलास जानकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .