खरसुंडी प्रतिनिधी
कोळे ता. सांगोला येथील लिंगैक्य गुरु मूर्ती रुद्रपशुपती मठाचे तिसावे पिठाधिपती यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा ता.२ रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त ता.३१ मे पासून कोळे येथील मुख्य मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ता.३१ रोजी पहाटेपासून गंगा अवाहन ,पंचाचार्य, पार्वती परमेश्वर, नवग्रह, नंदी,चतुषष्टी, स्वस्ति पुण्य वाचन , अष्टद्वीपपालक , एकादस ,रुद्र पूजा व गणेश याग तसेच परम-हस्य ग्रंथ वाचन संपन्न होणार आहे . त्यानंतर सायंकाळी कोळे व नाझरे येथील मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून शि.भ.प .हनुमंत कोरे महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे.
ता.१ जुन रोजी रुद्र याग होम हवन व परम-हस्य ग्रंथ वाचन समाप्ती होणार आहे . त्यानंतर मंगळवेढा व नाझरे येथील मंडळाचा भजन कार्यक्रम तसेच शि.भ .प .राजेश्वर स्वामी लाळेकर यांची कीर्तन सेवा होणार आहे.
ता.२ जुन रोजी पुण्यस्मरणाचा मुख्य सोहळा होणार असून या दिवशी समाधीस लघुरुद्र अभिषेक. प्राणप्रतिष्ठापना, मंगल आरती व महाप्रसाद होणार आहे. यावेळी श्री श्री श्री 108 गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी चिटगुप्पी व कोळे मठाचे 31 वे पिठाधीपती यांच्यासह विविध मठांंचे शिवाचार्य उपस्थित राहणार आहेत .
या सर्व धार्मिक विधींचे पौराहित्य आग्नेय शस्त्री पुराणिक व सहकारी करणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन श्री श्री श्री 108 रुद्र पशुपती 31वे पिठाधीपती यांच्या मार्गदर्शनाखाली वीरशैव लिंगायत समाज व ग्रामस्थ कोळे व गुरुगादी मठ कोळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सर्व सोहळ्यास मठाचे शिष्यवर्ग व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे