खरसुंडीचे पोलीस पाटील बापूराव इंगवले यांना शासनाचा विशेष सेवा पुरस्कार जाहीर.
खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथील पोलीस पाटील बापूराव पांडुरंग इंगवले यांची सन 2024 करिता विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांनी जाहीर केले आहे .
उद्या १ मे महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालय सांगली येथे होणाऱ्या कार्यक्रमात मा. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. मा. राज्यपाल पुरस्कार मिळाले बद्दल श्री इंगवले यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.