खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथे श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट व गुरव समाज यांच्या वतीने ता. २९ रोजी सामुदायिक मौजी बंधन कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सांगलीसह नजीकच्या जिल्ह्यातून पंच्याहत्तर बटुंनी सहभाग घेतला.
श्री सिद्धनाथ मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत हॉल, भोजन व धार्मिक विधींची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित बटू व त्यांच्या कुटुंबीयांमुळे मंदिर परिसर गजबजुन गेला होता यावेळी बटूंना आशीर्वाद देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, ग्रामस्थ ,सर्व विश्वस्त व गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टच्या या उपक्रमामुळे समाज बांधवांचा वेळ व पैसा वाचला असल्याचे मत व्यक्त होत आहे.