आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील खांबांना बसवलेली चांदी गायब झाल्याचे प्रकरण गेले चार महिने गाजत आहे.देवस्थान ट्रस्ट व भावीक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याबाबत धर्मादाय आयुक्त व पोलीस यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या असून चौकशीचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये देवस्थानच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका असणारा श्री पूजक गुरव समाज गप्प होता त्या समाजाने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती त्यामुळे या प्रकरणातील गुढ कायम होते.
अखेर आज समाजाने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसून ट्रस्टच्या गैरकारभारामुळे समाजाची नाहक बदनामी होत असल्याचे स्पष्ट केले.
या माध्यमातून देवस्थान ट्रस्ट मुळे गुरव समाजाकडे भाविकांचा पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र स्व समाजाने केलेल्या या स्पष्टीकरणामुळे देवस्थान ट्रस्ट या प्रकरणात एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
खरसुंडी.ता. आटपाडी येथे पत्रकार परिषदेसाठी उपस्थित श्री पूजक गुरव समाज बांधव.
📍 पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे.
📌 खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिरामध्ये व्यवस्थापनातील देवस्थान ट्रस्ट व श्री पूजक या स्वतंत्र यंत्रणा.
📌 देवस्थान ट्रस्टमध्ये जमा होत असलेली चांदी व मौल्यवान वस्तूंशी गुरव समाजाचा कोणताही संबंध येत नाही मात्र देवस्थान ट्रस्टमुळे समाजाची मोठी बदनामी होत असल्याचा दावा.
📌 अपवादात्मक परिस्थितीत गुरव समाजाने पदरमोड करून पूजेची परंपरा अखंडित ठेवली असल्याचा दावा.
📌 देवस्थान ट्रस्टने पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा द्यावा अन्यथा समाजाचा तक्रारदारांबरोबर राहण्याचा इशारा.