ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी ता. आटपाडी येथील श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट विरोधात आर.पी.आयच्या वतीने सांगलीत बेमुदत घंटानात आंदोलन. धर्मादाय उप आयुक्तांचे लेखी पत्रा नंतर आंदोलन स्थगित .

 आटपाडी प्रतिनिधी -

 महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान मध्ये समावेश असणाऱ्या  खरसुंडी येथील श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्टवर कलम 83 व ४१ डी नुसार  कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आर.पी.आय. वतीने  सांगलीत धर्मादाय कार्यालयासमोर आज पासून बेमुदत घंटानात आंदोलन सुरू करण्यात आले आहे .

 आर.पी.आय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली सुरु  असलेल्या या आंदोलनामध्ये खरसुंडी येथील श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या गैरकारभारा बाबत विविध मागण्या करण्यात  आलेल्या आहेत . आंदोलनांमध्ये धनंजय वाघमारे ,सुश्मिता मोटे, अश्विनी तोरणे ,विलास धांडोरे, शरद वाघमारे ,विवेक सावंत ,स्वप्निल बाबर ,लक्ष्मण मोटे यांच्यासह आर.पी.आय.चे विविध पदाधिकारी सामील झाले आहेत .आंदोलन स्थळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष शेखर निचळ, वैभव पुजारी ,किरण पुजारी ,सुनील पाटील ,राहुल गुरव ,विवेक पुजारी यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.गेले तीन महिने देवस्थान ट्रस्ट बाबत सुरु असलेल्या विविध तक्रारींच्या  पार्श्वभूमीवर सांगलीत थेट धर्मादाय कार्यालया समोर होत असलेल्या या आंदोलना कडे भाविकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र सायंकाळी धर्मादाय उप आयुक्त सांगली यांनी ट्रस्ट बाबत कारवाई बाबतचा चौकशी अहवाल  मा.सह धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांचेकडे पाठवले बाबतचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

 अंदोलकांच्या प्रमुख मागण्या :-

 👉 खरसुंडी येथील देवस्थान ट्रस्ट विश्वस्त कायदा 1950 अंतर्गत कलम 83 व 41 डी अन्वये तात्काळ कारवाई करावी .

 👉   चांदी चोरी प्रकरणी विश्वस्तावर फौजदारी कारवाई करावी .

 👉 धर्मादाय निरीक्षक ज्ञानेश्वर आंधळे यांच्यावर विविध प्रकरणी कारवाई करावी .

 👉 देवस्थान ट्रस्ट चौकशी प्रकरणी जबाबदार धर्मादाय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी .

 👉 देवस्थान ट्रस्ट मध्ये ऑनलाइन देणगीसाठी वैयक्तिक खात्याचे  क़्युआर कोड जोडून लाखोंची फसवणूक    करण्यावर कारवाई करावी .

  👉देवस्थान ट्रस्ट कारभाराबाबत खरसुंडी ग्रामस्थ ,भक्तगण ,देणगीदार यांच्या उपस्थितीत जन सुनावणी घेण्यात  यावी .

  👉ट्रस्टची चौकशी होईपर्यंत बँक खाते सील करण्यात यावीत .

  👉  देवस्थान ट्रस्ट संबंधित सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात यावीत .

  👉  धर्मादाय निरीक्षकांनी दिलेल्या भेटीचे अहवाल व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात यावीत .

   👉सिद्धनाथ मंदिरातील दानपेटीतील जमा रोख रक्कम व वस्तूंची महिना निहाय माहिती मिळावी.

               देवस्थान ट्रस्टने आरोप फेटाळले .

 श्रीनाथ देवस्थान ट्रस्टने यापूर्वीच आर .पी .आय .जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केलेले आरोप फेटाळले 

असून सर्व आरोप खोटे व चुकीच्या अर्धवट माहिती द्वारे केलेले आहेत खरात यांनी अशा  प्रकारच्या 

आरोपांमधून ट्रस्ट व तीर्थक्षेत्राची नाहक होणारी बदनामी थांबवावी असे आवाहन केले आहे.


सांगली येथे  धर्मादाय कार्यालया समोर खरसुंडी ता. आटपाडी येथील नाथ  देवस्थान ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी आर.पी.आय.च्या वतीने  घंटानाद अंदोलन करण्यात आले.


Previous Post Next Post