आटपाडी प्रतिनिधी
करगणी ता. आटपाडी येथील जेष्ठ नेते विजयसिंह तात्यासो पाटील उर्फ विजू अण्णा यांचे आज अल्पशा आजाराने भारती हॉस्पिटल सांगली येथे निधन झाले.
करगणी सह तालुक्याच्या राजकारणावर गेली अनेक दशके त्यांनी आपला ठसा उमटवला होता. करगणीचे सरपंच, पंचायत समिती सभापती, पोलीस पाटील, अशा विविध पात्र पदावर त्यांनी काम पाहिले होते. त्याचबरोबर विधानसभेची निवडणूक ही त्यांनी लढवली होती.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली ,पत्नी, भाऊ असा परिवार आहे बुधवार ता. पाच रोजी सकाळी नऊवाजता करगणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विधी अधिकारी विक्रमसिंह पाटील यांचे ते वडील होते.
विजयसिंह पाटील उर्फ विजू अण्णा
