खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील जेष्ठ गायक भगवान सावळा इंगवले वय ८३ यांचे अल्प आजाराने निधन झाले.त्याचे पाठीमागे मुले मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. ते जेष्ठ गायक होते.आपल्या मधुर आवाजाने त्यांनी कोकण परीसरात मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता.त्यांचे निधनामुळे एक सच्चा लोककलावंत हरपला आहे रक्षा विसर्जन शुक्रवार ता.२९ रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.