ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात पंचांग वाचनाने नववर्षाची सुरुवात

खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात पंचांग वाचनाने नववर्षाची सुरुवात करण्यात आली.
खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात आज सकाळी नित्योपचार झाल्यानंतर श्रींची सदरेवरील बैठकी पूजा बांधण्यात आली. त्यानंतर मुख्य मंदिरावर ब्रह्मध्वज उभारण्यात आला. दुपारी देवस्थानचे पुजारी व ग्राम जोशी यांच्या उपस्थितीत पंचांग पूजन व वाचन करण्यात आले .
यावेळी ग्राम जोशी नामदेव पाठक यांनी नुतन संवस्तराचे फल तसेच पर्जन्यमान व पीकधारणा यांचे वाचन केले. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खरसुंडी येथील पंचांग वाचन.


Previous Post Next Post