आटपाडी प्रतिनिधी
आगामी जि.प.व प.स. निवडणुकीबाबत प्रसंगी आघाडी करायचे असल्यास याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच केला जाईल मात्र काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद ,पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार तयार ठेवावेत असे आवाहन माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी केले.
नेलकरंजी ता. आटपाडी येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते .कार्यक्रमास खा. विशाल पाटील ,जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत, माजी मंत्री रमेश बागवे ,प्रा. सिकंदर जमादार ,डॉ. जितेश कदम .तालुकाध्यक्ष जयदीप भोसले व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले स्वर्गीय मोहन काकांच्या पश्चात या तालुक्यात काँग्रेसचा विचार कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस ताकतीने लढेल यासाठी साम ,दाम ,दंड याबरोबरच सर्व ताकद कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभी केली जाईल.
खासदार विशाल पाटील यांनी कै. मोहनराव भोसले यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून यामुळे तालुक्यात काँग्रेसचा कार्यकर्ता व विचार जिवंत असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी खासदार निधी व सिंचन योजनांसाठी केंद्रातील निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.
जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी आगामी निवडणुकीत आटपाडी तालुका काँग्रेस सत्तेत दिसेल त्यासाठी आवश्यक ताकद कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभी करू असे मत व्यक्त केले.
निरीक्षक व माजी मंत्री रमेश बागवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सामान्य जनता काँग्रेस बरोबर राहील असा विश्वास व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान व बचाव फक्त काँग्रेसच करू शकते .असे सांगितले.
प्रस्ताविकात तालुकाध्यक्ष जयदीप भोसले म्हणाले की या तालुक्यात स्वर्गीय मोहन काकांच्या पश्चात काँग्रेसचा विचार लोकांच्यात कायम आहे. निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज आहेत मात्र पक्षाने योग्य ती ताकद त्यांच्या पाठीमागे उभे करणे आवश्यक आहे.
यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती राहुल गायकवाड ,ॳड. विलास देशमुख ,सदाशिव ढगे व अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नंदकुमार शेळके, महादेव पाटील, गजानन सुतार, शहाजी पाटील, विजयकुमार पुजारी ,बाबासाहेब भोसले, विठ्ठल ढोबळे ,बाबासाहेब कोडग,शिवाजीराव मोहिते, संजय कटके महाराज, शहाजी शिंदे ,जालिंदर कटरे ,जालिंदर भोसले, मोहनराव भोसले सर, बापूराव खाडे ,अर्जुन कोळेकर ,सचिन गुरव आबासाहेब साठे व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .आभार तानाजी पाटील सर यांनी व्यक्त केले.