ब्रेकिंग न्यूज

नेलकरंजी ता.आटपाडी येथे उद्या ता.२४ रोजी काँग्रेसचा संवाद मेळावा.

 आटपाडी प्रतिनिधी

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उद्या ता. 24 रोजी नेलकरंजी येथे आयोजित केला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष जयदीप भोसले यांनी दिली आहे. 

नेलकरंजी येथील मातोश्री अंबुताई मोहनराव भोसले विद्यालयात दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या या मेळाव्यास खासदार विशाल पाटील ,माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम ,जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबरोबरच ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे .त्यामुळे या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री जयदीप भोसले यांनी केले आहे.



Previous Post Next Post