ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र, देवस्थान ट्रस्टचा उपक्रम.

खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात अन्नछत्र सेवेचा शुभारंभ गुढीपाडव्यानिमित्त करण्यात आला.
 याबाबत अधिक माहिती अशी की येथील श्री सिद्धनाथ देवस्थान महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यात प्रसिद्ध आहे. वर्षभरामध्ये विविध उत्सव, यात्रा, पौर्णिमा दरम्यान लाखो भावी या ठिकाणी भेट देत असतात. त्यामुळे भाविकांची मागणी लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टने वर्षभर अन्यछत्र सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेचा शुभारंभ आज गुढीपाडव्यानिमित्त करण्यात आला.
 दररोज सकाळी 11 ते 2 या कालावधीत हे अन्नछत्र सुरू राहणार असून देवस्थान समितीने यासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे.

खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात अन्नछत्र शुभारंभ

देवस्थान ट्रस्टच्या अन्नछत्र सेवेसाठी भाविकांनी रोख व वस्तु स्वरूपात मदत करावी तसेच अन्नछत्राचा लाभ घ्यावा.
                       चंद्रकांत पुजारी.
               अध्यक्ष श्री नाथ देवस्थान ट्रस्ट.
Previous Post Next Post