आटपाडी प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष२०२५ व सहकार मंत्रालयाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय आटपाडी यांच्या वतीने श्रीक्षेत्र खरसुंडी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली खरसुंडी विकास सोसायटी लि, खरसुंडी व चौंडेश्वरी पतसंस्था आटपाडी यांच्या सौजन्याने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत पटांगण, जोगेश्वरी व सिद्धनाथ मंदिर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
कार्यक्रमास सहाय्यक निबंधक सुषमा शिंदे ,सहकारी अधिकारी सागर शिंदे, नामदेव लोखंडे ,खरसुंडी विकास चेअरमन सुवर्णा पुजारी, चिंचाळे विकास चेअरमन भाऊसो गायकवाड, वलवण विकास चेअरमन शहाजी शिंदे, देवस्थानचे चेअरमन चंद्रकांत पुजारी, चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन राहुल सपाटे, संचालक चंद्रकांत दौंडे, सचिव बालक डोईफोडे विकास संस्थांचे सचिव, कर्मचारी, उपस्थित होते.
खरसुंडी येथील श्री सिध्दनाथ मंदिरात स्वच्छता अभियान प्रसंगी अधिकारी, व पदाधिकारी