आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील बालेखान गुलाब तांबोळी वय ६२ यांचे आज अपघाती निधन झाले.आज सकाळी तासगाव सांगली दरम्यान दुचाकी व डंपर यांच्यात झालेल्या अपघातात ते जागीच मृत्यू झाले.वडापाव व्यवसायाच्या निमित्ताने ते बाळु भै या नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.एक हसतमुख व मनमिळाऊ व्यक्तिमत्व हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे . त्यांच्या पश्चात मुलगा,सुन,मुलगी व पत्नी असा परिवार आहे.