आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी पश्चिम भागात काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
काल सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या पाऊस मध्यरात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणावर पडत होता. यामुळे नेलकरंजी, घुलेवाडी ,धावडवाडी ,खरसुंडी ,चिंचाळे ,घाणंद,वलवन, झरे परिसरामध्ये ठीक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी उशिरा पेरलेल्या ज्वारीचे पीक वाहून गेले आहे. बहारामध्ये असणाऱ्या डाळिंबांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे .कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने ठीक ठिकाणी शेतीमधील बांध फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ठीक ठिकाणच्या ओढ्यावरील पूल व भराव वाहून गेल्याने दळणवळण ठप्प झाले आहे .पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
व्हिडिओ पहाण्यासाठी लिंक ओपन करा.
https://youtube.com/shorts/YHZoAB6huas?feature=shared