ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी पश्चिम भागातील टेंभुच्या पाण्याचा प्रश्न निकालात,आ.गोपीचंद पडळकर यांचा पुढाकार

खरसुंडी प्रतिनिधी 
खरसुंडी ता. आटपाडी येथे टेंभू योजनेचा कालवा गावाच्या एका बाजूने गेल्याने कालव्याच्या पश्चिमेस असणाऱ्या क्षेत्राला पाण्याचा कोणताही लाभ मिळत नव्हता. त्यामुळे बहुतांश क्षेत्र टेंभूच्या लाभापासून वंचित होते .यामुळे भूड पंपगृहातुन खानापूर घाटमाथ्याकडे जाणाऱ्या वाहीकेला मेंगाणवाडी येथे छेद देऊन बलवडी घाटाच्या माथ्यावर बंद पाईपलाईन द्वारे पाणी आणल्यास या भागाचा पाणी प्रश्न सुटणार होता .याबाबत परिसरातील शेतकऱ्यांची बरेच वर्षे मागणी होती मात्र वन विभागाच्या परवानगी अभावी हे काम रखडले होते. 
याबाबत गत आठवड्यात आ. गोपीचंद पडळकर यांनी या कामांमध्ये तातडीने लक्ष घालून वन विभाग व टेंभूचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून काम गतीने मार्गी लावले.
           आज पाण्याचा खरसुंडीच्या दिशेने प्रवास सुरू झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी श्रींचे पुजारी वैभव  यांच्या हस्ते पाणी पूजन केले. यावेळी शेतकऱ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
              यावेळी सरपंच धोंडीराम इंगवले .विलास काळेबाग ,छगन साळुंखे, प्रमोद धायगुडे सोसायटी संचालक मोहन भोसले, एकनाथ भोसले, शंकर भिसे, ग्रामपंचायत सदस्य किरण पुजारी, शफिक तांबोळी, विजयकुमार सावकार हरी काका शिंदे, संभाजी इंगवले, धनंजय सावकार गजानन पुजारी ,अभिजीत पुजारी, विवेक पुजारी रंगनाथ मेटकरी, चंद्रकांत पोरे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             यामुळे खरसुंडी गावाचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार असून आगामी चैत्र यात्रेत पाण्याची कोणतीही टंचाई जाणवणार नाही.

खरसुंडी ता आटपाडी येथे आ.गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करताना ग्रामस्थ


Previous Post Next Post