आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्याचे अस्मिता म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या विजयासाठी आटपाडीकरांनी वज्रमूठ बांधली आहे. आटपाडी जिल्हा परिषद गटातील मतदारांनी एकत्रित येऊन बस स्थानक ते वीज मंडळ कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढली.
1995 साली अपक्ष आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम टेंभू योजनेसाठी कर्जरोखे उभारण्यासाठी अण्णांनी शासनाला भाग पाडले .त्यानंतर सातत्याने त्यांनी खानापूर तालुक्यातील आमदारांना सहकार्य केले .त्यामुळे आटपाडी तालुक्यातील मूलभूत प्रश्नांना न्याय मिळाला नाही आटपाडीच्या जीवनदायींनी असणारया माणगंगा कारखान्याच्या वाटचालीत सातत्याने अडथळे निर्माण होऊन बंद पडला. या सर्व बाबींच्या विचार करून आण्णांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे .त्यास तालुकावासियांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आटपाडीतील जागरूक नागरिक व काँग्रेसचे कार्यकर्ते इंजिनिअर महेश कुमार पाटील यांनी आज राजेंद्र आण्णा देशमुख यांना अमरसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला.
उद्या तारीख 15 रोजी महिलांची प्रचारफेरी
राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या प्रचारार्थ उद्या ता. 15 रोजी सकाळी नऊ वाजता आटपाडी येथे महीलांची भव्य प्रचार फेरी काढण्यात येणार आहे .यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आटपाडी जि.प .गटातील नागरिकांनी राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या प्रचारार्थ काढलेली प्रचार फेरी.
https://youtube.com/shorts/KGaQXHrVqzM?feature=shared