ब्रेकिंग न्यूज

श्रीनाथ जन्माष्टमी निमित्त खरसुंडी ता.आटपाडी येथे तारीख 16 पासून अखंड हरिनाम सप्ताह शनिवार ता. 23 रोजी जन्मोत्सव

आटपाडी प्रतिनिधी 
श्रीक्षेत्र खरसुंडी ता. आटपाडी येथे श्रीनाथ जन्माष्टमी निमित्त शनिवार ता. 16 पासून अखंड हरिनाम सप्ताह व भैरवनाथ महात्म्य ग्रंथाचे पारायण सुरुवात होत आहे. मुख्य मंदिरात दररोज काकड आरती ,ग्रंथवाचन, कीर्तन,हरीपाठ, भजन व अन्नदान अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह निमित्त तारीख १७ रोजी अर्चना दीदी साळुंखे ,ता, १८ रोजी पायल जरग लातूर, ता. १९ रोजी सारिका ताई व्यवहारे परितेकर ता. २० रोजी शितलताई तांदळे परभणी, ता. २१ रोजी सुनेत्रा जाधव सातारा, ता. २२ रोजी धरती ताई शेंडे हरोली ,ता.23 रोजी जन्माष्टमी निमित्त ह भ प चंद्रकांत गायकवाड शिरगावकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. 
मुख्य दिवस शनिवार ता. 23 रोजी मध्यरात्री बारा वाजता चंद्रोदयानंतर श्रींचा जन्मोत्सव संपन्न होणार आहे. ता.२४  रोजी ग्रंथ दिंडी मिरवणूक ,दहीहंडी, भारुड अशा कार्यक्रमांनी सप्ताहाची सांगता होणार आहे. जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमाची देवस्थान समितीच्या वतीने तयारी करण्यात आली आहे.


Previous Post Next Post