आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था गुरुसेवा पॅनेलने निर्विवाद बहुमताने जिंकल्याबद्दल निवडून आलेल्या सर्व संचालकांचा यथोचित सन्मान आ.गोपीचंद पडळकर यांनी केला .शिक्षक पतसंस्थेचा कारभार इतर सहकारी संस्थांनी आदर्श घ्यावा असा करावा अशी अपेक्षा व्यक्त करत नूतन संचालक मंडळास सदिच्छा दिल्या.
'प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत सत्ता परिवर्तन करण्यात शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु टी जाधव यांच्यासह शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी व शिक्षक नेते जगन्नाथ कोळपे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावल्याबद्दल पॅनलचे मार्गदर्शक यु टी जाधव यांचा तसेच सर्व नूतन संचालकांचा गौरव आमदारांनी केला.
यावेळी पतसंस्थेचे नुतन संचालक शिवाजीराव लेंगरे ,नानासाहेब झुरे ,ललिता लवटे ,सदाशिव सरक किरण सोहनी ,जनार्दन मोटे, संजय काळेल , स्वीकृत संचालक बिरुदेव मुढे या नुतन संचालक मंडळाचाही यथोचित सत्कार करण्यात आला .
यावेळी शिक्षक बँकेचे संचालक सचिन खरमाटे, शिक्षक समितीचे नेते शामराव ऐवळे, शिक्षक संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख समाधान ऐवळे,नेते अधिकराव खांडेकर, आदर्श शिक्षक हैबतराव पावणे ,जीवन सावंत,विजय पवार, आकाराम कोळपे ,किशोर पिसे, शिवाजी बडे, वसंतराव सरक आदी उपस्थित होते .