ब्रेकिंग न्यूज

आटपाडीतील वीरशैव पतसंस्थेत महात्मा बसवेश्वर पॅनेल विजयी

आटपाडीतील वीरशैव पतसंस्थेत महात्मा बसवेश्वर पॅनेल विजयी
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील बहुचर्चित वीरशैव नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत महात्मा बसवेश्वर पॅनल ने सर्व 11 जागा जिंकत सत्तांतर केले. विद्यमान चेअरमन सतीश भिंगे यांच्या संस्थापक कै. सुभाष भिंगे पॅनल चा पराभव केला.
आटपाडी तालुक्यात अग्रेसर असणाऱ्या वीरशैव पतसंस्थेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या राजीनामा नाट्य नंतर या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते .आज सकाळपासून मतदान झाल्यानंतर सायंकाळी सहाय्यक निबंधक कार्यालयात मतमोजणी झाली. यामध्ये विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढील प्रमाणे सर्वसाधारण गट
भारत जवळे- ७४६, केदारनाथ भिंगे-७४१, राहुल घोंगडे-७१७, अमोल राजमाने- ७१२, संगम डोंबे -६७६,अजित भिंगे-६७६
महिला प्रतिनिधी शोभा डिगोळे-६९३ शिल्पा हेकणे-६५६
भटक्या विमुक्त जाती जमाती दत्तात्रय माने-७०१
अनुसूचित जाती जमाती
अनिल रुपटक्के-७२०
इतर मागास प्रवर्ग दिलीप लिगाडे-७४६
निवडीनंतर विजयी पॅनेल व समर्थकांनी फटाक्याचे प्रचंड आता शिवाजी करून जल्लोष व्यक्त केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री बिपीन मोहिते यांनी कामकाज पाहिले.


Previous Post Next Post