ब्रेकिंग न्यूज

राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या प्रचारार्थ अमरसिंह देशमुख यांची दिघंची येथे प्रचार फेरी. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

आटपाडी प्रतिनिधी 
अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत दिघंची येथे प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर मतदार उपस्थित होते. 
दिघंची येथील प्रमुख भागात मतदारांशी संवाद साधल्यानंतर बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले की मतदारसंघांमध्ये अतिशय चांगले वातावरण असून कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोचून आपले रिक्षा हे चिन्ह समजावून सांगणे गरजेचे आहे. राजेंद्र अण्णांची उमेदवारी ही तालुक्याची उमेदवारी असल्याने आता सर्वांनी गट तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .
यावेळी दिघंची गटातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरसिंह देशमुख यांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाली आहे.

दिघंची ता.आटपाडी येथे राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या प्रचारार्थ अमरसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली प्रचार फेरी.

Previous Post Next Post