आटपाडी प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड .वैभव पाटील यांच्या खरसुंडीतील प्रचाराचा शुभारंभ श्री सिद्धनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी वैभव पाटील यांनी जनतेच्या पाठबळावर बदल घडवण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना वैभव पाटील म्हणाले की मतदारसंघांमध्ये विरोधकांकडे टेंभू हा एकच मुद्दा आहे. मात्र ॲड.सदाशिवराव पाटील यांच्या कालावधीमध्ये मतदारसंघात अनेक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. त्याचबरोबर मतदारसंघाच्या समतोल विकासाच्या दृष्टीने अनेक विकास कामांची नियोजन केले होते .मात्र विरोधकांनी मतदारसंघा मध्ये धाक धपटशाही व गुंडगिरी च्या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम केले. त्यामुळे मतदारसंघातील नियोजनबद्ध विकाससाठी जनतेच्या आशीर्वादाने आपण निश्चित विजय होऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमास शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष शेखर निचळ, राजेंद्र गायकवाड शामराव इंगवले,माजी उपसरपंच मच्छिंद्र भोसले, विजयकुमार सावकार, ग्रामपंचायत सदस्य किरण पुजारी, विक्रम बेरगळ, धनंजय सावकार ,बादशाह इनामदार, विवेक पुजारी. यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार अमोल कोल्हे यांची उद्या प्रचार सभा.
अँड.वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ लोकप्रिय खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची आदर्श महाविद्यालया शेजारी पटांगणात सोमवार ता.11 रोजी दुपारी १२.१५ वाजता जाहीर सभा होणार आहे.