आटपाडी प्रतिनिधी
महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्री सुहास बाबर यांचा खरसुंडीतील प्रचाराचा शुभारंभ श्रीनाथ मंदिरातून करण्यात आला. यावेळी युवा नेते पृथ्वीराज तानाजीराव पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, बंडूशेठ कातुरे व ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी शिवसेना व मित्र पक्षांच्या वतीने श्री सिद्धनाथ मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला .त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत मतदाराशी संपर्क साधून धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले .
यावेळी खरसुंडी व परिसरामध्ये कै. अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून रस्ते, टेंभू व नागरी सुविधांबाबत झालेला कामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आला.
कार्यक्रमास देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, माजी सरपंच अर्जुन सावकार ,विकास सोसायटीचे चेअरमन विजयकुमार भांगे ,संचालक जगदीश पुजारी, ग्रामपंचायत सदस्य निलेश पोमधरणे, सुभाष माळी ,जांभुळणीचे महादेव जुगदर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुहास भैया बाबर यांना परिसरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.