ब्रेकिंग न्यूज

आदर्श पतसंस्था सचिव पुरस्कार बालक डोईफोडे यांना. मोफत वाचनालय आटपाडी व सहकार भारतीचा उपक्रम. उद्या तारीख चार रोजी होणार वितरण समारंभ

आटपाडी प्रतिनिधी
मोफत वाचनालय आटपाडी व सहकार भारती तर्फे कै. बी .ए. भिंगे सर, यांचे स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श पतसंस्था सचिव पुरस्कार यावर्षी चौंडेश्वरी पतसंस्थेचे सचिव बालक डोईफोडे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून उद्या ता.४ रोजी दुपारी एक वाजता आटपाडीत चौंडेश्वरी मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे .कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्ष सौ वैशालीताई आवाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आहेत .कार्यक्रमास सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष विवेक गुळवणी, सहकार भारतीचे संघटक संजय परमने, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कुलकर्णी यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे .
       या कार्यक्रमास सहकार चळवळीतील व अन्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सतीश भिंगे, दत्तात्रय स्वामी ,सुनील भिंगे, एस. एन. पाटील, बाबासाहेब माळी, चंद्रकांत दौंडे यांनी केले आहे.

श्री बालक डोईफोडे सचिव चौंडेश्वरी पतसंस्था आटपाडी


Previous Post Next Post