ब्रेकिंग न्यूज

स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा अस्थि कलश ता.३व ४ रोजी आटपाडीत ,लाडक्या नेत्याला अखेरचा सलाम करण्याची आटपाडीकरांना संधी.

आटपाडी प्रतिनिधी
आ. अनिल (भाऊ) बाबर यांचे ता. ३१ जानेवारी रोजी आकस्मिक निधन झाल्याने आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली होती.
जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत खंबीर असणारे अनिल भाऊ आपल्यातून गेल्याने  तालुकावासीयांचा आधारवड हरपला होता. निधनानंतर तालुक्यामध्ये संपूर्ण व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली होती. त्याचबरोबर मोठ्या संख्येने नागरिकांनी अंत्यविधी व रक्षाविसर्जनास हजेरी लावली होती .तरीही बहुसंख्य लोकांची आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. त्यामुळे ता. ३व ४ रोजी स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचा अस्थिकलश श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजले पासून नागरिक या अस्थिकलशाचे दर्शन घेऊ शकणार आहेत.


Previous Post Next Post