ब्रेकिंग न्यूज

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी सोमवार ता.५ रोजी राजेवाडी या.आटपाडी येथील कारखान्यावर मोर्चा .तर ता.८ पासून जन आक्रोश संवाद यात्रा. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची माहिती.

आटपाडी प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने  ता.८ फेब्रुवारी रोजी आटपाडी तालुक्यात जन आक्रोश आंदोलन काढण्यात येणार आहे .त्यासाठी दिघंची येथील संगम मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी राजवाडे कारखान्याबाबत माहिती दिली.
 ते म्हणाले पिढ्यानपिढ्या दुष्काळी असणाऱ्या आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. अशावेळी माणगंगा कारखाना बंद आहे तर राजेवाडी कारखाना आटपाडी तालुक्यातील ऊस तोडणी साठी टाळाटाळ करत आहे ही शोकांतिका आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील अन्य कारखाने ३००० पेक्षा जास्त देत असताना राजेवाडी येथील श्री रविशंकर हा कारखाना २७०० दर देतो त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना ज्यादा पैसे द्यावे लागत आहेत. यासह अन्य मागण्यासाठी ता. पाच रोजी कारखान्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्य प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी ता. ८ रोजी तालुक्यात जन आक्रोश संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक गावात व प्रत्येक माणसापर्यंत संवाद साधला जाणार आहे. बैठकीस दिघंची परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिघंची ता.आटपाडी येथे बोलताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे

Previous Post Next Post