ब्रेकिंग न्यूज

आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. मतदारसंघ गहिवरला.


आटपाडी प्रतिनिधी
आज आ.अनिल भाऊ बाबर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संपूर्ण खानापूर मतदारसंघ शोकाकुल झाला होता. स्वयंस्फुर्तीने मतदार संघातील सर्व व्यवहार बंद ठेवून लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. आज सकाळी विटा येथे त्यांचे राहते घरी पार्थिव आल्यानंतर नंतर एकच गर्दी झाली. यावेळी बाबर कुटुंबियांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थित जनसमुदायही गहीवरला . त्यानंतर आ. बाबर यांची सजवलेल्या ट्रॅक्टर मधून विटा शहरात अंत्ययात्रा काढून पार्थिव त्यांचे गार्डी येथील निवासस्थानी नेण्यात आले त्या ठिकाणी मान्यवरांनी दर्शन घेतल्यानंतर पार्थिव चार वाजता जीवन प्रबोधिनी विद्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आले . येथे संपूर्ण शासकीय इतमामात आमदार बाबर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार बाबर यांचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
जीवन प्रबोधिनी विद्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक व राजकीय नेते दाखल झाले होते .त्या ठिकाणी अंत्यविधी पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे ,मंत्री शंभूराजे देसाई ,मंत्री दीपक केसरकर,खासदार संजय पाटील ,आमदार जयंत पाटील आमदार विश्वजीत कदम ,आमदार सुमनताई पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार शहाजी बापू पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार मोहनराव कदम,माजी आमदार सदाशिवराव पाटील, शिवाजीराव नाईक ,राजेंद्र आण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख,जिल्हा बँकेचे सर्व संचालक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी उपस्थित होते .अंत्यविधीपूर्वी आमदार बाबर यांना शासनाच्या वतीने शोक धून वाजवून व बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सुपुत्र अमोल व सुहास बाबर यांच्या हस्ते विधी करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी आमदार अनिल भाऊ  अमर रहे अशा घोषणा दिल्या.
लोकांच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करणारा एक आदर्श लोकप्रतिनिधी गेल्याने खानापूर मतदारसंघाचे व राज्याचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न साकार करणे हीच श्रद्धांजली ठरेल .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

आ.अनिल भाऊ बाबर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला जनसमुदाय.

Previous Post Next Post