ब्रेकिंग न्यूज

आमदार बाबर यांच्यावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार


आटपाडी प्रतिनिधी
आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनामुळे मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. आमदार अनिल बाबर यांनी वयाच्या ७४  व्या वर्षी सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. राज्यातील शेती व सिंचन याबाबत अभ्यास असणारा लोकप्रतिनिधी हरपला आहे. बाबर यांच्या निधनाचे वृत्त समजताच मतदार संघामध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.आमदार  बाबर यांच्या निधनामुळे आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांसह सर्व वरिष्ठ नेते विट्याकडे रवाना झाले आहेत. विटा येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर दुपारी चार वाजता जीवन प्रबोधनी विद्यालय गार्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
आ. बाबर यांच्या निधनामुळे शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा लोकप्रतिनिधी हरपला आहे.
                        श्री .एकनाथ शिंदे
                                मुख्यमंत्री 
                               
Previous Post Next Post