ब्रेकिंग न्यूज

आमदार अनिल बाबर यांचे निधन, सांगली जिल्ह्यावर शोककळा.

आटपाडी प्रतिनिधी
खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आमदार अनिल(भाऊ) कलेजराव बाबर यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले आहे. काल त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सांगली येथील एका रुग्णालयात दाखल केले होते. रात्री त्यांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.
आमदार बाबर यांनी खानापूर मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सिंचना सह दुष्काळी भागातील प्रश्नांचे सखोल ज्ञान असणारे नेतृत्व हरपले आहे .टेंभूच्या प्रश्नासाठी आयुष्यभर सुरू असणारा त्यांचा संघर्ष आज थांबला आहे.

आ.अनिल (भाऊ) बाबर.

Previous Post Next Post