ब्रेकिंग न्यूज

तानाजीराव पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड

आटपाडी प्रतिनिधी
सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील (आटपाडी )यांची सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.शासनाने ता.२५ रोजी याबाबत आदेश प्रसिध्द केला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजा बाबत त्यांना  अनुभव असल्याने शासनाने त्यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती केली आहे.पाटील यांच्या या निवडीमुळे मतदारसंघातील जिल्हा नियोजनाच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तानाजीराव पाटील (सदस्य जिल्हा नियोजन समिती)

Previous Post Next Post