ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी चैत्र यात्रेची पाकाळणीने सांगता, दमदार पाऊसाची हजेरी.

खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेची आज पाकाळणीने सांगता झाली. पाकाळणीस पावसाने हजेरी लावल्याने भाविकांचा उत्साह दुनावला. याबाबत अधिक माहिती अशीही येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेची पाकाळणीने सांगता होत असते. आज सकाळी पाकळणी निमित्त मुख्य मंदिरात पूर्णतः स्वच्छता करण्यात आली. सासनकाठी व पालखी सोहळ्यामुळे मंदिर परिसर व मुख्य पेठ गुलालाने माखली होती. आज सकाळी मुख्य मंदीर व परिसराची यंत्राच्या साह्याने पूर्ण स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर देवाच्या नित्य पूजेतील सर्व वस्तू, दागिने ,कपडे यांचीही स्वच्छता करण्यात आली .या कामासाठी मंदिरातील पुजारी, सेवेकरी, भाविक यांनी परिश्रम घेतले. दरम्यान दुपारी दोन वाजता अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली .त्यामुळे मंदिरा बाहेरील परिसर, दीपमाळा, मुख्य शिखर यासह पेठेतील गुलाल पूर्णपणे निघुन गेला. पाकाळणीला दमदार पावसाच्या हजेरीमुळे भाविक व ग्रामस्थ सुखावून गेले.

खरसुंडी ता.आटपाडी येथे पाकाळणी साठी पाऊसाची हजेरी.

Previous Post Next Post