ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथील जि.प.शाळा नं १ व २ च्या इमारतीचे शिवसेना ठाकरे गटा कडून भुमीपुजन

खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथे जि.प.शाळा नं १व२ साठी पी.एम.श्री.योजनेतुन मंजूर इमारतीचे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष शेखर निचळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.शाळेसाठी केंद्र सरकारने १कोटी ६५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.या बाबत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाठपुरावा करण्यात आला होता.
यावेळी उपस्थित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आटपाडी तालुकाप्रमुख शेखर (भाऊ) निचळ, राष्ट्रवादी सांगली जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष जालिंदर कटरे, काँग्रेसचे युवा नेते सचिन  गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ.रणजीत भांगे, आग्नेन (काका) पुजारी, युवा नेते रुपेश गुरव, ऋषिकेश भिसे, अभिजीत केंगार, पांडुरंग केंगार निलेश जावीर, बिरुदेव कटरे, सिकंदर शेख, केंद्रप्रमुख विश्वास पुजारी सर, शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक आयवळे सर, शाळा नंबर दोन मुख्याध्यापक कांबळे सर, धनाजी केंगार सर आणि सर्व शिक्षक स्टाफ आणि आम्हाला साथ देणारे खरसुंडी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

शाळा इमारत भुमीपुजन प्रसंगी शेखर निचळ व अन्य

Previous Post Next Post