आटपाडी प्रतिनिधी
श्री क्षेत्र खरसुंडी येथे सिद्धनाथ नवरात्पारोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीने वेग घेतला आहे. नवरात्रोत्सवासाठी मुख्य मंदिरात स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचबरोबर देवस्थानच्या लवाजम्यातील व नित्य वापरातील वस्तू, दागिने, कपडे यांचीही स्वच्छता करण्यात येणार आहे .संपूर्ण धुपआरती मार्गावर भाविकांच्या वतीने भव्य मंडप व विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
नवरात्रोत्सवास ता. ३ रोजी घटस्थापनेने प्रारंभ होणार असून तदनंतर दररोज त्रिकाळ धुपारती, उत्सव मूर्तीची विविध रूपातील पूजा, जागर असे कार्यक्रम होणार आहेत. ता. 10 रोजी सिद्धनाथ मंदिर हरजागर तर ता.११ रोजी घट उत्थापन व जोगेश्वर मंदिर हरजागर होणार असून पालखीचा मुक्काम जोगेश्वरी मंदिरात असणार आहे. ता.१२ रोजी विजयादशमी निमित्त साखर वाटप सोहळा होणार असून ता. १३ रोजी चिंचाळे हद्दीतील देव सीमोल्लंघन सोहळा व नगरप्रदक्षिणा संपन्न होईल.
नवरात्र उत्सवा दरम्यान श्रींच्या उत्सव मूर्तीची विविध रूपातील सालंकृत पूजा, वैशिष्ट्यपूर्ण फेरपूजा, नामवंत बॅड पथकांचे हजेरी ,व सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण असणार आहे.