ब्रेकिंग न्यूज

क्रांतीवीर नागनाथआण्णां, डॉ . पाटणकर यांच्यामुळेच दुष्काळग्रस्तांचे जीवन सुसह्य आनंदरावबापू पाटील - सादिक खाटीक .


आटपाडी  प्रतिनिधी 
                क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ . भारत पाटणकर यांच्या चळवळीमुळेच दुष्काळग्रस्तांचे, जीवन सुसह्य झाल्याचे मत   पाणी संघर्ष चळवळीचे प्रणेते आनंदरावबापू पाटील आणि राष्ट्रवादी ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी काढले .
                ज्येष्ट स्वातंत्र्यसेनानी, पाणी संघर्ष चळवळीचे नेते, माजी आमदार डॉ . क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या १२ व्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आत्म्यास अभिवादन आणि प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत माणगंगा कृषी विद्यालय भिंगेवाडी - आटपाडी येथे स्मृतिदिन साजरा  करणेत आला . 
                सादिक खाटीक यांच्या समवेतच्या तत्कालीन पत्रकार व अन्य सहकाऱ्यांनी,  डॉ . भारत पाटणकर क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना डिसेंबर १९९२ मध्ये प्रथमतः आटपाडी तालुक्यात आणले . लाखो दुष्काळग्रस्तांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा पाणी प्रश्न नागनाथआण्णांच्या चळवळीमुळेच मार्गी लागल्याने, आटपाडीसह १३ दुष्काळी तालुक्यातील जनतेने नागनाथआण्णांची जयंती - पुण्यतिथी मोठ्या  आत्मीयतेने साजरी करायला हवी . अशा अपेक्षा आनंदरावबापू पाटील यांनी व्यक्त करून,
                १९९३ साली क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ . भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली १३ दुष्काळी तालुक्यांच्या शेतीच्या पाण्याच्या लढ्याचे रणशिंग फुंकले गेले . चळवळीच्या प्रखर आंदोलने, रेट्यामुळेच त्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी टेंभूच्या पूर्ततेसाठी भरीव आर्थिक तरतूद करीत ही योजना पूर्णत्वास नेली . शेती असणाऱ्या आणि नसणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ६ हजार घनमीटर समन्यायी पद्धतीने पाणी वाटपाचे धोरण चळवळीमुळेच स्विकारण्यात आले . बंदिस्त पाईपलाईनने सर्वत्र पाणी देण्याचा पथदर्शक प्रयोगही आटपाडी तालुक्यात शासनाने  राबविला, हे चळवळीचेच यश आहे . असे ही आनंदरावबापू पाटील - सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले .
                भागात कृष्णामाईचे पाणी आल्यामुळे भागाचे पिढ्यान पिढ्याचे दशावतार संपले . देशभर होणारे स्थलांतर थांबले . प्राणी, पशु, पक्षी आणि जनतेचे पाण्याअभावी होणारे अनन्वीत हाल थांबले . भागातल्या जीवसृष्टीला नवसंजीवनी देण्याचे काम नागनाथआण्णांच्या चळवळीने केले . असेही आनंदरावबापू पाटील - सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
                यावेळी पाणी वापर संस्था संचालक दिगंबर मरगळे ,सोपेकाॅम पुणेचे उमेश लेमटे, अमोल माने, भिमराव यमगर, अजय म्हारनूर, सामाजिक कार्यकर्ते अंकुश मुढे, कृषी महाविद्यालय आटपाडीचे प्राचार्य आर . एस . थोरात सर, प्रा. एस . डी . मोकाशी मॅडम, प्रा . ए . एस . कदम मॅडम, प्रा . आर . एस . पिंगळे मॅडम, प्रा . ए . एन . निचळ मॅडम, प्रा . पी . यु . हाके मॅडम, यासह परिसरातील शेतकरी व प्रशालेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आटपाडी येथे डॉ.नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना आनंदराव बापू पाटील, सादिक खाटीक व मान्यवर.

Previous Post Next Post