ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी खिलार जनावरांची पौष यात्रा भिवघाट रोड वरील यात्रा तळावर. ता.२५ पासुन सुरवात या.२९ रोजी प्रदर्शन. बाजार समिती व ग्रामपंचायत संयुक्त बैठकीत निर्णय.

आटपाडी प्रतिनिधी.
खरसुंडी ता. आटपाडी येथील खिलार जनावरांची पौषयात्रा तारीख २५ जानेवारीपासून भिवघाट रोडवरील  यात्रा तळावर भरणार असून जातिवंत खिल्लार जनावरांचे प्रदर्शन तारीख २९  रोजी घेण्यात येणार असल्याचा निर्णय बाजार समिती व ग्रामपंचायत खरसुंडी यांच्या संयुक्त सभेत घेण्यात आला. खिलार जनावरांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज ग्रामपंचायत कार्यालयात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यास सरपंच धोंडीराम इंगवले, सभापती संतोष पुजारी, उपसभापती राहुल गायकवाड व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
       सुरुवातीस सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी नवीन बाजार तळाची पाहणी केली त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत यात्रेबाबत चर्चा करण्यात आली त्यामध्ये बाजार समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या सुविधांबाबतची माहिती सचिव शशिकांत जाधव यांनी दिली त्यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यात्रेबाबतच्या सुविधां बाबत अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेत वीज, पाणी, प्रदर्शन याबाबत कोणतीही गैरसोय न होता मागील काळापेक्षा अधिक सुविधा देण्यात येतील  तसेच प्रदर्शनातील विजेत्या शेतकऱ्यांना वाढीव बक्षीस रक्कम देऊन गौरवण्यात येईल असे सांगितले. प्रास्ताविक सरपंच धोंडीराम इंगवले यांनी तर आभार ग्रामपंचायत सदस्य विक्रम भिसे यांनी व्यक्त केले .
     यावेळी जिल्हा बँकेचे  उपाध्यक्ष शशिकांत देठे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी, शफिक तांबोळी ,माजी उपसरपंच अर्जुन पुजारी ,सोसायटीचे अध्यक्ष जगदीश पुजारी, देवस्थान विश्वस्त विजयकुमार भांगे , शिवसेना ( ठाकरे गट) तालुकाध्यक्ष शेखर निचळ,बाजार समितीचे संचालक सुबराव पाटील, शंकर भिसे, माणिक गाढवे, विठ्ठल गवळी, सुनील तळे, शरदचंद्र काळेल व ग्रामस्थ उपस्थित होते.


Previous Post Next Post